कविता :- ओढ़ लागे जीवा

 
ओढ़ लागे  ती  मलाही …
श्वास  रोखून  जातसे ..
डोक्यावर  येता  तुझा  हात ..
सावरून  मन जातसे..
 
काय सांगू  मी मनाचे
काय स्थित्यंतर  होतसे..
मी माला ही न कधीही..
आरश्यात पाहिले असे .
 
 
बिंब प्रतिबिंबातुनी
मज फरक न सापडे ..
पण कुठे तरी कही तरी …
घडले बिघडले असे..
 
 
स्वत्वाच्या जाणिवेतूनी
जातो नेणिवेकडे ..
शब्द कुठले, अर्थ कुठला….
काही फरक न पड़े..
काहीही ना अजुनी उलगडे ..
 
का उदास झाले रे मन ,
का न बदले ही स्थिती..
घोरंधाराची ना भीती अन
ना दिसे तो प्रकाश
ना दिसे ती सावली …
 
दाखव रे तुझे रूप सख्या हरी रे ..
कष्ट ज्यास्तव भोगिले ..
डोळे मिटून पडलो रे दयाळा
आपल्या बाहूत घे ..
 
शेखर

2 Comments Add yours

    1. shekharonline says:

      thanks, me baryach kavita college madhe astana lihilya hotya adhun madhun takat jaeen!

Leave a reply to Rahul Sonar Cancel reply