कृष्ण उवाच … गुरु आणि मी एकच आहोत!!!

उद्धवाला गुरूंचे महत्त्व सांगताना कृष्ण सुद्धा तल्लीन होऊन जातो आणि म्हणतो की ते आणि मी वेगळे नसून, त्या वेषातून  मीच तुझ्यासमोर कायम उभा असतो आणि त्यांचे स्मरण केल्यास ते माझ्या जवळच पोहोचेल! भगवान दोन पावलं पुढे जाऊन आई वडलांच्या ठिकाणी असणारी प्रत्येकाची जवळीक ही त्याच्या जन्म मृत्युच्या यातना संपवणाऱ्या सद्गुरुंपेक्षा जवळची नसू शकते हे उदाहरण देऊन सिद्ध करतात.. कमालीचा काही ओव्या..
 

गुरूपासोनि दीक्षाग्रहण । तें पुरुषासी नवें जन्म जाण ।
गुरु मायबाप संपूर्ण । तें ऐक लक्षण उद्धवा ॥८०॥
उपजलिया बाळकासी तत्त्वतां । पंचविध जाण पिता ।
जनिता आणि उपनेता । तिजा प्रतिपाळिता अन्नदानें ॥८१॥
जो भयापासूनि सोडविता । जे बंधविमोचन करविता ।
जो देहाचें मरण चुकविता । तोही पिता शास्त्रार्थें ॥८२॥
यांवेगळा पांचवा पिता । जो झाडणी करी पंचभूतां ।
मृत्यूपासून सोडविता । जो गर्भव्यथा निवारी ॥८३॥
ज्याचे देखिलिया चरण । बांधूं न शके भवबंधन ।
तो सद्‍गुरु पिता जाण । भाग्येंवीण न पाविजे ॥८४॥
उपजल्या बाळकासी सर्वथा । वेगळालीं माता पिता ।
एक वीर्यातें निक्षेपिता । धारणपोषणता जननीची ॥८५॥
तैसा सद्‍गुरु नव्हे पिता । निजवीर्य न वेंचितां ।
योनिद्वारें नुपजवितां । जननी जनिता स्वयें झाला ॥८६॥
उदराबाहेरी घातल्यापाठीं । माता पुत्रस्नेहें कळवळा उठी ।
बाहेरिलें सूनि आपुले पोटीं । निजस्नेहें गोमटी गुरुमाता ॥८७॥
यालागीं शिष्यासी तत्त्वतां । सद्‍गुरुचि माता पिता ।
निजस्नेहें वाढविता । तदात्मता अभेदें ॥८८॥
मागील पिते जे चौघेजण । ते याचे सावत्र बाप जाण ।
माता पिता भिन्न भिन्न । सखेपण त्यां कैंचें ॥८९॥
यालागीं सद्‍गुरु जो सकृपू । तो सच्छिष्यासी सखा बापू ।
पित्यापुत्रांमाजीं अल्पू । कांहीं विकल्पू उपजेना ॥९०॥

Here, Shree Krishna tells Uddhava (& to us) that follow that advice which your Guru gives you, as it is in His form that I am there with you. He looks after you as your father and your mother, though he has not given birth to you. But, it is He, who has looked after you since last births and deaths and always there to free you out of this cycle. He classifies four fathers of every child, with Guru being the fifth and the only true one!

 

text from Satsangdhara

Advertisements

3 Comments Add yours

 1. Very nice page…keep up posting…

  by the way, from where you get this these lines ? eknathi bhagwat ??

  1. Rupesh says:

   There is a website about sant eknath maharaj -www.santeknath.org from which you can get Eknathi Bhagwat free downloadable

 2. Rupesh says:

  thanks for such a great job… Keep it up sir, Eknathi Bhagwat is very nice book. I read it regularly. mind gets peaceful after riding it. Can you pls gives us some information regularly about sant eknath

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s