father’s day

 सध्या बऱ्याच  गोष्टीना जास्त महत्त्व दिल्या जातय असे वाटते… पण कधी कधी असे ही वाटते की ते  महत्त्व द्यायलाच हवे..
उदाहरणार्थ कालचा फादर’स डे.. सध्याच्या युगात बाबांना दमल्यावर सुद्धा काम करायची इच्छा काही जात नाही…
आमच्याच तीर्थरूपांची गोष्ट घ्या ना.. आत्ता निवृत्तीची वेळ होऊन गेली तरी काम करणे सुरूच आहे.. म्हंटल    कधी तरी आराम करा  आता निवृत्ती आली तरी ऑफिस चे वेध सोडा पण नाही..
 
एका जागे वर बसायचा पिंडच नाही!  काय सांगावे काळात नाही.  बर मागच्या पिढीच्या आवडी निवडी त्यामानाने कमीच!
मागच्या पिढीत छंदी फंदी लोक कमीच असावेत असे वाटते कारण सगळे सरळ एकाच मार्गाने चालणार.. इकडे तिकडे बघणार नाही आणि प्रश्न ही करणार नाही..
ह्याउलट आजची पिढी – असेच का? विचारायलाही कमतरता मानत नाही..

 
बाबांना हस्तरेखा पाहण्याचा तेवढाच एक छंद आहे… अभ्यास ही आहे.. बराच सा.. तीस एक वर्षांचा म्हणावा लागेल बहुदा..
पण त्यामानाने त्यांनी तो व्यावसायिक रीत्या प्रयत्न न केल्यामुळे म्हणा नाहीतर धंदेवाईक  पणा न आणल्यामुळे म्हणा… जास्त आत जाऊ शकले नाहीत त्या क्षेत्रात पण आता वेळ आहे ना… ?पण एक दुसरा प्रॉब्लेम म्हणजे.. त्यांच्याकडे सगळे त्रासिक हातच येतात असे त्यांचे म्हणणे आहे… हे त्यांचे नेहमीचे गाणे असते..त्यांच्या तरुणपणाच्या काळात त्यांना दुबई मध्ये १० एक वर्ष राहता आला त्यामुळे त्यांची विचारांची पद्धतच बदलली.. .

त्याधी घरात अग्निहोत्र आणि कर्मठ संस्कार.. आणि तिथून सरळ दुबई … १८० अंशाचा बदल.. सगळ्याच बाबतीत..

बाबांचे वैशिष्ट्य म्हणजे कायमचा “तरुणपणा” सध्याच्या  एका जाहिरातीत दाखवतात त्याप्रमाणे… ते काका रात्री घराबाहेर निघून मित्राची नवीन गाडी घेऊन कुठेतरी मोठ्या चक्कर मारायला जातात आणि सकाळी सरळ घरी येतात आणि मग वंदना गुप्ते एन्ट्री मारतात त्या जाहिराती मध्ये … क्या हो गया ना, कहा गये थे रात भर… असे काही तरी म्हणतात…

 त्यांचे हे तरुणपण तसेच राहो आणि उत्साह ही असाच राहो..

माझ्या बाबतीत म्हणायचे तर आमच्या कुंडल्यांमध्ये षडाष्टक योग आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.. मी वृश्चिक आणि बाबांची मिथुन.. पण काही बाबतीत त्यांचे गुण घेण्या सारखे आहेत ..

माझा उत्साह गणपती बघण्याचा ० तर त्यांचा फुल टू धम्माल …

त्यांच्या मते तर मला तरुण झाले पाहिजे… २५’त असून ही … हाहाहा.. 

सगळ्याच वडलाना फादर’स  डे च्या शुभेच्छा  .. मुलांना ही वडलांची काळजी असतेच की हो..

 
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s