समर्थे समर्थ करावे ||

मनास वाटे रामा

तुझेच होऊनी जावे |

श्रवणात तव कथांच्या

सामर्थ्य अंगी बाणावे ||

कीर्तनी तुझ्या रामा

मन रंगुनी जावे |

भजनी तुझ्या रामा

स्वस्वरूप आठवावे ||

नामास तुझ्या रामा

स्वत्व वाहून द्यावे ||

पाद सेवनातून

आत्मारामी झेप घ्यावे ||

तव अर्चनी रामा

रूप चित्ती साठावे ||

तव चरणी ठेवून माथा

शेवटचे श्वास जावे ||

दास म्हणुनी रामा

मज कडियेवरी घ्यावे ||

वात्सल्य तुझे रामा

मज प्राप्त व्हावे ||

असाराच्या वाटेत रामा

सख्य तुझेच लाभावे ||

एक निमिष ही रामा

तू सोडून मज न जावे ||

रामनामी रामा

आता हे मन लागावे ||

आत्मनिवेदनातून रामा

मनी प्रगट व्हावे ||

रामा मज कधीही

सोडून न जावे |

तुजवीन ह्या जगी

मज कोणीच ना आठवावे ||

राम राम राम

ह्यातच मन गुंतवावे ||

ह्या अपुल्या लेकुराला

समर्थे समर्थ करावे ||

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s