विचारांची भटकंती

विचारांच्या बाणांवर शरपंजरी मी पडलो…
त्या बाणांच्या टोकावरले विष पचवत चाललो |
 
एवढ्या विचारांतच मीच मला विसरत चाललो ..
ह्या विचारांच्या चक्रव्यूहात अभिमन्यूच झालो |
 
बाहेर निघायचा प्रयत्न करताच , जास्त वार झेलू लागलो |
विचारांनी रक्ताबंबाळ झालो, अन् मीच मला विसरत चाललो .. ||
 
विचारांच्या तळपत्या उन्हात, चटके खात चाललो…
सावली शांत मनाची, चारी दिशा शोधत चाललो |
 
पण ती न सापडता , भोवळ येवून पडलो…
आणि माझ्यातला मीच हरवत चाललो |
 
माझ्याकडे मी दुस्रयांच्या नजरेतून बघत चाललो..
माझ्यातला मीच शोधत चाललो ……
 
विचारांच्या झंझावातात मी गुरफटत चाललो   …
आणि माझ्यातला मीच हरवत चाललो |
 
या चंचल मनाचे निर्णय साधत चाललो
दर वेळी चुकली वाट तरी पुढे सरतच चाललो ….
माझ्या जगण्यावर मीच रडत चाललो .. हसत चाललो …
आणि माझ्यातला मीच हरत चाललो |
 
रात्री अंधारात स्वप्न बघत चाललो ..
स्वप्नांच्या गुंत्यात मी गुंतत चाललो ||
माझ्याकडून मी जास्त अपेक्षा ठेवू लागलो ..
अपेक्ष्यांच्या ओझ्याखाली मी दबत चाललो …  
ह्या (स्व) अपेक्षा कधी पूर्ण करू शकेन का?
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s